संत गजानन अभियांत्रिकीमध्ये एमसीए अभ्यासक्रमाची मान्यता

संत गजानन अभियांत्रिकीमध्ये एमसीए अभ्यासक्रमाची मान्यता

‘संत गजानन अभियांत्रिकी’मध्ये
एमसीए अभ्यासक्रमाची मान्यता
महागाव, ता. १० : येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाला एमसीए (मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. याला ‘एआयसीटीई’ने मान्यता दिली असून शिवाजी विद्यापीठ यासाठी संलग्नित आहे. कोल्हापूरनंतर ग्रामीण भागात प्रथमच हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी येथे परवानगी मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांनी दिली.
अभ्यासक्रम दोन वर्षांचा असून साठ प्रवेशक्षमता आहे. यासाठी बीई, बीसीए, बीटेक, बीएससी, बीए, बीकॉम, पदवी पन्नास टक्के गुणांनी उत्तीर्ण व एमसीए प्रवेश पात्रता परीक्षा सीईटी देणारे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. शिवाय फिनिशिंग स्कूलअंतर्गत आयटीमधील आधुनिक कोर्सचे प्रशिक्षण देऊन कॉलेजअंतर्गत नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ईबीसी व शिष्यवृत्तीही मिळणार असल्याने इच्छुकांनी विद्यार्थी समन्वयक प्रा. महेश भांदिगरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com