Thur, March 30, 2023

म्हाकवेतील अपघातग्रस्त तरुणास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत
म्हाकवेतील अपघातग्रस्त तरुणास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत
Published on : 30 January 2023, 6:15 am
04189
अपघातग्रस्त तरुणास मदत
म्हाकवे : येथील अपघातग्रस्त बाजीराव सदाशिव पाटील यांना मुख्यमंत्री सहाय्या निधीतून पन्नास हजारांची मदत देण्यात आली. धनादेश राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते अपघातग्रस्तांचे वडील सदाशिव पाटील यांना सुपूर्द केला. काही दिवसांपूर्वी म्हाकवे-केनवडे रस्त्यावर बाजीराव पाटील यांचा अपघात झाला होता. त्यांची परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केली. यावेळी रामभाऊ चौगुले, शिवाजीराव जाधव, दत्ता वाडकर,अनिल कांबळे उपस्थित होते.
----
04189
म्हाकवे : बाजीराव पाटील यांना धनादेश प्रदान करताना राजेश क्षीरसागर व अन्य.