म्हाकवे हायस्कूल मध्ये चोरी : चोरट्यांचा कागदपत्रांवर डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाकवे हायस्कूल मध्ये चोरी : चोरट्यांचा कागदपत्रांवर डल्ला
म्हाकवे हायस्कूल मध्ये चोरी : चोरट्यांचा कागदपत्रांवर डल्ला

म्हाकवे हायस्कूल मध्ये चोरी : चोरट्यांचा कागदपत्रांवर डल्ला

sakal_logo
By

04230- म्हाकवे: येथील म्हाकवे इंग्लिश स्कूलमध्ये चोरट्यांनी तिजोरी फोडून कागदपत्रे विस्कटली.
----

म्हाकवेत शाळेतील
कागदपत्रांवर चोरट्यांचा डल्ला

सकाळ वृत्तसेवा

म्हाकवे, ता. १० : येथील म्हाकवे इंग्लिश स्कूल, म्हाकवे या शाळेमध्ये काल रात्री अज्ञात चोरट्यांनी कडी-कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. या चोरीमध्ये महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत कागल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, येथील म्हाकवे इंग्लिश स्कूल, म्हाकवेमध्ये काल रात्री अज्ञात चोरट्यांनी मुख्याध्यापक यांच्या व सायन्सच्या प्रयोगशाळेच्या खोल्यांचे कडी-कोयंडे तोडून चोरीचा प्रयत्न केला आहे. यामध्ये प्रयोगशाळेतील साहित्य विस्कटून टाकण्यात आले. तर यातील काही साहित्य शाळेच्या व्हरांड्यामध्ये आणून टाकण्यात आले आहे. मुख्याध्यापक यांच्या तिजोरीचे कुलूप तोडून महत्त्वाची कागदपत्रे लंपास केल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी श्वानपथक मागवले होते. या श्वानाने शाळेच्या बाहेरून मुख्य रस्त्यावर मार्ग दाखविला व तेथेच घुटमळले. याबाबतची फिर्याद मुख्याध्यापक पी. बी. भारमल यांनी कागल पोलिसांत दिली आहे.
----