पहिल्या फ्युच्युरीस्टीक क्लासरूमचे शुक्रवारी केनवडे येथे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्या फ्युच्युरीस्टीक क्लासरूमचे 
शुक्रवारी केनवडे येथे लोकार्पण
पहिल्या फ्युच्युरीस्टीक क्लासरूमचे शुक्रवारी केनवडे येथे लोकार्पण

पहिल्या फ्युच्युरीस्टीक क्लासरूमचे शुक्रवारी केनवडे येथे लोकार्पण

sakal_logo
By

04243
केनवडे : येथे देशातील पहिल्या फ्युच्युरिस्टिक क्लासरूमची उभारणी करण्यात आली आहे.

फ्युच्युरिस्टिक क्लासरूमचे केनवडेत
शुक्रवारी अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
म्हाकवे : कागल तालुक्यातील केनवडे या डोंगराळ गावातील प्राथमिक शाळेत साकारलेल्या देशातील पहिल्या फ्युच्युरिस्टिक क्लासरूमचे लोकार्पण होत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते व आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १७) दुपारी २ वाजता हा कार्यक्रम होत आहे. याबाबत मुख्य संयोजक माजी सरपंच दत्ता पाटील-केनवडेकर म्हणाले, ‘‘डिजिटल शिक्षणासाठी एक कोटी रुपये खर्चून उच्च तंत्रप्रणालीद्वारे शिक्षण देणारी क्लासरूम साकारली आहे. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे व शिक्षकांसह मुलांच्या बायोमेट्रिक हजेरीचे नियोजन आहे. या कार्यक्रमास माजी पालकमंत्री सतेज पाटील, संजय घाटगे, के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, युवराज पाटील, सुशीलकुमार लवटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, भैया माने, अंबरिशसिंह घाटगे, नवीद मुश्रीफ, प्रवीणसिंह पाटील, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक ए. बी. माने उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, येथील भैरवनाथ सेवा संस्थेने स्वमालकीची दुमजली इमारत उभारली आहे. या इमारतीचे उद्‍घाटनही अजित पवार यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला नागरिकांसह शिक्षणप्रेमीनी उपस्थित राहावे.’’