निपाणी मुरगुड रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पुर्ण करा : खासदार संजय मंडलिक ठेकेदार व अधिकाऱ्यांना सुचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निपाणी मुरगुड रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पुर्ण करा  : खासदार संजय मंडलिक  ठेकेदार व अधिकाऱ्यांना  सुचना
निपाणी मुरगुड रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पुर्ण करा : खासदार संजय मंडलिक ठेकेदार व अधिकाऱ्यांना सुचना

निपाणी मुरगुड रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पुर्ण करा : खासदार संजय मंडलिक ठेकेदार व अधिकाऱ्यांना सुचना

sakal_logo
By

04293
निपाणी-मुरगूड रस्त्याचे
काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

खासदार मंडलिक; ठेकेदार व अधिकाऱ्यांना सूचना

म्हाकवे, ता. १० : निपाणी- देवगड रस्त्यापैकी सध्या लिंगनूर-हमिदवाडा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी खासदार मंडलिक यांनी भेट दिली. दर्जेदार कामाबाबत समाधान व्यक्त करत उर्वरित रस्त्यांची कामेही दर्जेदार पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना खासदार मंडलिक यांनी अधिकारी व ठेकेदारांना दिल्या.
निपाणी-देवगड महत्वपूर्ण असणाऱ्या राज्यमार्गाच्या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. नागरिकांनी वारंवार मोर्चे, आंदोलने करून प्रशासनाला जाग आणली. खासदार संजय मंडलिक यांच्यासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून अधिकाऱ्यांना कामाच्या पुर्ततेबाबत सुचना करत सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे रस्त्याचे काम गतीने सुरू झाले. लिंगनूर ते हमिदवाडा दरम्यान कामाच्या ठिकाणी खासदार मंडलिक यांनी भेट दिली.
यावेळी निपाणी-मुरगूड मार्गावर अनेक गावे, शाळा, वेडीवाकडी वळणे आहेत. येथे सूचना फलक तसेच आवश्यक तेथे रंबल पट्ट्या किंवा पांढरे पट्टे ओढण्याच्या सूचनाही खासदार मंडलिक यांनी अधिकारी व ठेकेदारांना दिल्या. यावेळी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, दत्ता पाटील-केनवडेकर, अतुल जोशी, बिद्रीचे माजी संचालक बाजीराव गोधडे उपस्थित होते.