Wed, June 7, 2023

म्हाकवेत युवकाची नैराश्यातून आत्महत्या
म्हाकवेत युवकाची नैराश्यातून आत्महत्या
Published on : 19 March 2023, 7:16 am
4302
...
म्हाकवेत एकाची नैराश्यातून आत्महत्या
म्हाकवे : कोराना काळात खासगी कंपनीत असणारी नोकरी गेली, त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून म्हाकवे (ता.कागल) येथील एकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नामदेव शिवराम कुंभार (वय ४५) असे त्यांचे नाव आहे. घटनेची नोंद कागल पोलिसात झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कुंभार यांची पत्नी माहेरी गेली होती. तर मुलेही घरात नसलेली पाहून त्यांनी राहत्या घरात तुळईला दोरखंडाच्या सहाय्याने गळफास घेतला. ११ वीत शिकणारी मुलगी दार उघडून आत येताच ही घटना निदर्शनास आली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
---