श्री दत्त देवस्थानच्या हॉस्पिटलचा स्लॅब पूर्ण

श्री दत्त देवस्थानच्या हॉस्पिटलचा स्लॅब पूर्ण

05089
आडी : येथील श्रीदत्त देवस्थान मठाच्या वतीने वंदूर येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल इमारतीच्या स्लॅबचा प्रारंभ करताना परमात्माराज महाराज. (छायाचित्र ः रमेश पाटील म्हाकवे)
..............
श्री दत्त देवस्थानच्या
हॉस्पिटलचा स्लॅब पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. १० : आडी येथील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने वंदूर (ता. कागल) येथे परमात्मराज अधिष्ठान ट्रस्टमार्फत नव्याने बांधल्या जात असलेल्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब टाकण्यात आला. परमात्मराज महाराजांच्या पुढाकाराने हे हॉस्पिटल बांधण्यात येत आहे.
परमात्मराज महाराजांच्या हस्ते स्लॅब टाकण्याचा प्रारंभ झाला. १४ हजार स्क्वेअर फुटांचा स्लॅब टाकण्यात आला. आडी, बेनाडी, हंचिनाळ, सौंदलगा, हणबरवाडी, कोगनोळी, कोडणी, म्हाकवे, मत्तिवडे, वंदूर, सुळगांव, शेंडूर, करनूर, अकिवाट, हेरवाड, बेलवळे, कागल, कोल्हापूर येथील भाविक या प्रसंगी उपस्थित होते. गारवा घेऊन आलेल्या महिलांची संख्या अधिक होती. याप्रसंगी देवीदास महाराज, श्रीराम महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, श्रीधर महाराज व आश्रमस्थ विद्यार्थीही उपस्थित होते.
उद्योगपती सुखदेव साळुंखे (कोल्हापूर), राजू मोरे (कोल्हापूर), महादेव वाळके, सदाशिव वाळके (अकिवाट), सचिन रणनवरे, ठेकेदार ओम शेखर (रायचूर,कर्नाटक), मारुती संकपाळ (कागल), इंजिनिअर विठ्ठलराव मगदूम (कोल्हापूर), पोलिस निरीक्षक चंद्रकांत शेडगे, पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब पालवे (कोल्हापूर), के. पी. पाटील, वीरशैव बँकेचे संचालक अरविंद माने, भरत पाटील, संतोष जाधव कोल्हापूर यांच्यासह दिवसभरात असंख्य भाविकांनी हजेरी लावली.
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com