const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();
कर्मचाऱ्यांच्या योगदानाबरोबरच हित महत्वाचे  :  संजय घाटगे अन्नपुर्णा कारखान्यावर कामगार दिन साजरा

कर्मचाऱ्यांच्या योगदानाबरोबरच हित महत्वाचे : संजय घाटगे अन्नपुर्णा कारखान्यावर कामगार दिन साजरा

अन्नपूर्णा साखर कारखाना
म्हाकवे : कामगारांचे योगदान व प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. कर्मचा-यांचे भविष्य सुजलाम-सुफलाम करण्याचा मानस आहे; असे प्रतिपादन अन्नपुर्णाचे संस्थापक चेअरमन संजयबाबा घाटगे यांनी केले. केनवडे (ता. कागल) येथील अन्नपूर्णा शुगर येथे कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, ‘आमच्या सर्वच संस्था आदर्शवत आहेत. संस्थेशी संबधीत सर्व घटक प्रामुख्याने कर्मचारी सुखी झाला पाहिजे.’ स्वागत सागर लोहार यांनी केले सुनिल कोकीतकर, राजू मोरे, शामराव चौगले, सिव्हील इंजिनिअर हंबीरराव पाटील,शेती अधिकारी श्रीनिवास कुलकर्णी, विष्णू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विरेन घाटगे, आकाराम बचाटे,कृष्णात कदम, विनायक चौगले, जे. एन. पाटील, तानाजी कांबळे, दत्तोपंत वालावलकर, शामराव पोवार,अशोक पाटील, महेश देशपांडे, विश्वास पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सुभाष पाटील यांनी तर आभार विठ्ठल करडे यांनी मानले.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना
सेनापती कापशी : काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल मॅनेजर संजय घाटगे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी अधिकारी व कामगार उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com