आरोग्यदायी ज्वारीला ‘अच्छे दिन’

आरोग्यदायी ज्वारीला ‘अच्छे दिन’

ज्वारीचा संग्रहित फोटो वापरणे...
.............
आरोग्यदायी ज्वारीला ‘अच्छे दिन’

हॉटेल, रेस्टॉरंटबरोबरच घरातही ज्वारीच्या भाकरीला मागणी

सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. ५ : शास्त्रीयदृष्ट्या ज्वारीला खूप महत्त्व आहे. हृदयरोग, मधुमेह, स्थुलता टाळण्यासाठी ज्वारी खाण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळेच ज्वारीच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या ४० ते ५० रुपये किलो दराने ज्वारीची विक्री होत आहे. गरिबांचे अन्न असणाऱ्या ज्वारीला चांगले दिवस आले आहेत.
सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरी ज्वारीचीच भाकरी असे. गहू महाग असल्याने त्याकाळी चपाती श्रीमंतांच्या घरी असायची. शेतकऱ्यांनी नगदी पिकांचे प्रमाण वाढविल्याने ज्वारीचे उत्पादन घटले. परिणामी ज्वारीच्या मागणीत वाढ झाल्याने तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे ज्वारीचे भाव वाढले आहेत.
सुशिक्षित तसेच शहराबरोबर खेड्यातील नागरिकांमध्ये ज्वारीच्या पोषण मूल्याची जागृती झाली. आरोग्यदायी ज्वारी खाण्याकडे कल वाढला आहे. साहजिकच ज्वारीचे भाव वाढण्यास मदत झाली. त्याचबरोबर रिसॉर्ट, खानावळी, हॉटेल्समध्ये ज्वारीच्या भाकरीची मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली. त्याचबरोबर ज्वारीपासून बनविलेल्या लाह्या, पापड, शिरा या पदार्थांना मागणी वाढत आहे. पोषणमूल्यांमुळे ज्वारीची मागणी वाढत आहे. गव्हापासून बनविलेल्या पदार्थांमध्ये ग्लूटामिनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोटाच्या तक्रारीत वाढ होत आहे. जडपणा, पचन न होणे यांसारख्या तक्रारीमुळे डॉक्टर गव्हापेक्षा ज्वारीची भाकरी खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे ज्वारीच्या मागणीत वाढ झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
....
चौकट...
बहुगुणी, आरोग्यदायी ज्वारी
ज्वारीमध्ये प्रथिने, खनिजांचे प्रमाण अधिक असते. तंतुमय पदार्थ अधिक असतात. त्यामुळे पचण्यास हलकी असते. मधुमेह, स्थूलता, हृदयरोग टाळण्यासाठी ज्वारीचे सेवन गुणकारी ठरते. ज्वारीतील फायटो केमिकल्समुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. निऑक्सिनमुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. पोटॅशिअम, मॅग्नेशिअम व मिनरल्समुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात ज्वारीची मदत होते. त्यामुळे डॉक्टर, आहारतज्ज्ञ ज्वारी खाण्याचा सल्ला देत आहेत.
...........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com