घोटवडे उपसरपंचपदी जयश्री औंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोटवडे उपसरपंचपदी जयश्री औंदे
घोटवडे उपसरपंचपदी जयश्री औंदे

घोटवडे उपसरपंचपदी जयश्री औंदे

sakal_logo
By

02879
घोटवडे उपसरपंचपदी जयश्री औंदे
माजगाव : घोटवडे (ता. पन्हाळा) उपसरपंचपदी जनसुराज्य गटाच्या जयश्री शशिकांत औंदे यांची बिनविरोध निवड झाली. जनसुराज्य व शिवसेनेत चुरशीने निवडणूक झाली होती. जनसुराज्यचे सरपंचपदाचे उमेदवार राजाराम पाटील सात सदस्यांसह विजयी झाले होते. उपसरपंच निवड निवडणूक अधिकारी उत्तम पाटील यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी शिक्षक नेते बाबासाहेब पाटील, महादेव पाटील, दगडू पाटील, बळवंत पाटील, आनंदा दिवाण, अमर पाटील, गोविंद लव्हटे, संजय औंदे, सागर लव्हटे, ग्रामसेविका सरिता पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.