कोतोली फाटा ते नांदारी मार्ग वाहनधारकांना ठरतोय धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोतोली फाटा ते  नांदारी मार्ग वाहनधारकांना ठरतोय धोकादायक
कोतोली फाटा ते नांदारी मार्ग वाहनधारकांना ठरतोय धोकादायक

कोतोली फाटा ते नांदारी मार्ग वाहनधारकांना ठरतोय धोकादायक

sakal_logo
By

02960
कोतोली : खोदाई केलेल्या रस्त्याशेजारी खडी भरून ठेवलेली छोटी पोती.

कोतोली फाटा - नांदारी मार्ग धोकादायक

दिशादर्शक फलक, बॅरिकेडचा अभाव

माजगाव ता. १४ : कोल्हापूर ते पाचलला सोयीचा व जलदगती जोडणाऱ्या मार्गाचे कोतोली फाटा ते नांदारीपर्यंत २८ किलोमीटर अंतराचे काम गतीने सुरू आहे. यासाठी आमदार डॉ. विनय कोरे यांच्या प्रयत्नातून एडीबी योजनेतून २०५ कोटींचा निधी मंजूर झाला. कामाला सुरुवात झाली. मात्र, खोदाईचा मार्ग दर्शविण्यासाठी रिफ्लेक्टर अगर बॅरिकेड लावण्याची गरज होती. खडीची पोती ठेवून ठेकेदारांनी जबाबदारी झटकली आहे. यामुळे रस्त्यावर अपघात होत असल्याने मार्ग धोकादायक ठरत आहे.
कोतोली फाटा ते नांदारीपर्यंत जागोजागी रस्त्याची खोदाई केली आहे. बाजूपट्टी पाच फुटांच्या मापाने खोलवर खोदली असून रस्त्याशेजारून पर्यायी मार्ग सुरू आहे. मात्र खोदाई केलेला मार्ग दाखविण्यासाठी रिफ्लेक्टर अगर बॅरिकेड लावण्याची गरज असताना खडीची पोती ठेवली आहेत. त्यामुळे रात्री रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार थेट चरीत पडून जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. मार्गावरून ऊसवाहतूक सुरू आहे. पर्यायी रस्त्यावरील धूळ थोपवण्यासाठी संबंधित विभाग रात्री रस्त्यावर पाणी सोडत असल्याने जागोजागी ऊस वाहने रूतून बसत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. संबंधित ठेकेदाराने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

चौकट.....
फलक, रिफ्लेक्टरची गरज
सकाळी रस्ता खोदाई नसते. मात्र, सायंकाळी रस्ता खोदाई करून वाहतूक मार्ग बदललेला असतो. त्यामुळे रात्री अपघात घडत आहेत. दिशादर्शनासाठी फलक व रिफ्लेक्टर लावले तर अपघात टळेल.