सोनुर्ले येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाचे पाणी पूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनुर्ले येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाचे पाणी पूजन
सोनुर्ले येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाचे पाणी पूजन

सोनुर्ले येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाचे पाणी पूजन

sakal_logo
By

02980

सोनुर्लेत प्रकल्पाचे पाणी पूजन
अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी; बाराशे एकर क्षेत्र ओलिताखाली येणार
माजगाव ता. २२ ः शाहूवाडी तालुक्यातील सोनुर्लेत वीस वर्षांपासून रखडलेल्या लघुपाटबंधारा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येऊन सुजलाम सुफलाम होईल. या प्रकल्पाचे पाणीपूजन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते झाले.
लघुपाटबंधारे विभागाकडून बांधलेल्या प्रकल्पाची ०.१३५ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. सोनुर्लेसह परळी, नांदारी, नांदगाव, उंड्री, निवडे गावांतील १२०० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याचा मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. अनेक वर्षे प्रलंबित असणारा हा प्रकल्प पूर्णत्वास नेल्याबद्दल आमदार कोरे यांचा सत्कार झाला.
प्रकल्पाच्या मजबुतीकरणासाठी आणखी निधी आवश्‍यक असल्याने निधीची उपलब्धता करून देऊ, अशी ग्वाही आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. आमदार कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी कार्यान्वित करण्यात आले. प्रकल्पासाठी अनेकांनी शेतजमिनी दिल्यामुळे रखडलेल्या प्रकल्पाचे काम पूर्ण करता आल्याचे कोरे यांनी नमूद केले. यावेळी कोरे यांच्या हस्ते शेतकरी, ठेकेदार सी. पी. बागल यांचा सत्कार झाला. यावेळी गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड, जि. प. माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, माजी जि.प. सदस्य शंकर पाटील, बाबा लाड, शिक्षक नेते बाबा पाटील, सरपंच भागोजी पाटील, नामदेव पोवार, राजन पाटील, रमेश कांबळे, अर्जुन पाटील, प्रशांत पाटील, विजय बाऊचकर, संदीप यादव, दगडू पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.