
माजगावात घोरपडीला जीवदान
03038
माजगावात घोरपडीला जीवदान
माजगाव ः येथे विशाल आनंदा चौगले यांच्या घरी लपलेल्या घोरपडीला परिमंडल वनधिकारी नाथाजी चौगले यांनी शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. चौगले यांना घराच्या भिंतीमध्ये घोरपड लपल्याचे लक्षात आले. भटक्या कुत्र्यांच्या तावडीत घोरपड सापडली असती. विशाल यांनी याची माहिती पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहिते यांना कळवली. मोहितेंच्या सूचनेनुसार परिमंडल वनधिकारी नाथाजी चौगले यांनी घराच्या भिंतीत लपलेल्या घोरपडीला इजा न करता सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले. ही घोरपड दीड फूट लांब व अंदाजे तीन वर्षे वयाची होती. एकीकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी संपावर असताना मात्र वनपाल नाथाजी चौगले यांनी कर्तव्य पार पाडले. यावेळी ग्रा.पं. सदस्य अजित चौगले, विशाल चौगले उपस्थित होते.