यवलूज येथील दवाखान्यातून रोखड लाबंविली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यवलूज येथील दवाखान्यातून रोखड लाबंविली
यवलूज येथील दवाखान्यातून रोखड लाबंविली

यवलूज येथील दवाखान्यातून रोखड लाबंविली

sakal_logo
By

यवलूज येथील दवाखान्यातून
२० हजारांची रोकड लांबविली

माजगाव, ता.१८ ः यवलूज-पडळ (ता. पन्हाळा) या मुख्य रस्त्यावरील एका दवाखान्यात अज्ञात चोरट्यांनी मागील दाराने प्रवेश करून २० हजारांची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबतची नोंद पन्हाळा पोलिसांत झाली आहे.
यवलूज-पडळ रस्त्यावर डॉ. पंडित मोरे यांचा दवाखाना आहे. डॉ. मोरे नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री १० वाजता दवाखाना बंद करून घरी गेले. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दवाखान्याच्या मागील बाजूच्या दाराने प्रवेश केला. आतील खोलीच्या दरवाजाची काच फोडून लोखंडी टेबलच्या ड्रॉव्हरचे लॉक कटावणीने तोडून त्यातील रोख २० हजारांची रोकड चोरून नेली. डॉ. मोरे यांच्या दवाखान्यामध्ये चोरट्यानी डल्ला मारत काही अंतरावर असलेल्या युवराज आकाराम पाटील यांच्या मोटारसायकलची तोडफोड करून पलायन केले. पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वी येथील अजित कृष्णात आडनाईक यांच्या बंद घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून एक ग्रॅम सोन्याचा दागिना चोरून नेला होता.
......................