Tue, March 28, 2023

वाघवे येथे शेतकऱ्याची दारूच्या नशेत आत्महत्या
वाघवे येथे शेतकऱ्याची दारूच्या नशेत आत्महत्या
Published on : 19 March 2023, 5:42 am
वाघवे येथे एकाची
दारूच्या नशेत आत्महत्या
माजगाव, ता.१९- वाघवे (ता.पन्हाळा) येथील सागर दिनकर पाटील (वय ४०) या शेतकऱ्याने दारुच्या नशेत झाडाच्या फांदीला गळफास घेवून आत्महत्या केली.या घटनेची नोंद पन्हाळा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मयत सागर पाटील हे शनिवारी रात्री उसाला पाणी पाजण्यासाठी ‘वाकीवडा’ परिसरातील शेतात गेले होते. तेथे त्यांनी दारुच्या नशेत आंब्याच्या झाडास गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी भांगलणीस गेलेल्या महिलांच्या निदर्शनास आली. या महिलांनी तातडीने त्यांच्या कुटुंबियांना सांगितले. पन्हाळा पोलिस ठाण्यात महादेव पाटील यांनी वर्दी दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. पाटील यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.