सुरक्षित सेवेसाठी कांबळे, गराडेंचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरक्षित सेवेसाठी कांबळे, गराडेंचा गौरव
सुरक्षित सेवेसाठी कांबळे, गराडेंचा गौरव

सुरक्षित सेवेसाठी कांबळे, गराडेंचा गौरव

sakal_logo
By

01904
मोहन कांबळे
01903
अशोक गराडे

सुरक्षित सेवेसाठी कांबळे, गराडेंचा गौरव
मलकापूर : चालक म्हणून गेली २५ वर्षे विनाअपघात व सुरक्षितपणे प्रवाशांना सेवा देणारे येथील आगारातील मोहन केशव कांबळे (येळाणे) व अशोक दत्तात्रय गराडे (देवाळे) यांना राज्य परिवहन महामंडळाकडून २५ हजारांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन कोल्हापूर येथे गौरविण्यात आले. आगारप्रमुख संजय भोसले यांनी ही माहिती दिली. भोसले म्हणाले, ‘‘मोहन कांबळे व अशोक गराडे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे ग्रामीण भागात सलग २५ वर्षे सेवा केली आहे.’’ दोघांना विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दरम्यान, मलकापूर आगारातही सलग पाच व दहा वर्षे विनाअपघात व सुरक्षित सेवा देणाऱ्या आठ जणांचा गौरव करण्यात आला. त्यात विजय खैरे, विजय बेटकर, माणिकराव देवकुळे, अस्लम तांबोळी, मनोज चव्हाण, सरदार पाटील, प्रमोद समुद्रे, धनाजी पाटील यांचा समावेश आहे.