मलकापूरात शिवाजीराजेंच्या पूतळ्याचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलकापूरात शिवाजीराजेंच्या पूतळ्याचे लोकार्पण
मलकापूरात शिवाजीराजेंच्या पूतळ्याचे लोकार्पण

मलकापूरात शिवाजीराजेंच्या पूतळ्याचे लोकार्पण

sakal_logo
By

01936

शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण
मलकापूरला उभारणी; विविध मान्यवरांची उपस्थिती

मलकापूर, ता. २१ ः येथील मुख्य सुभाष चौकातील छत्रपती शिवाजीराजेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा झाला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व खासदार धैर्यशील माने,आमदार विनय कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
येथील सुभाष चौकात १४ लाख लोकवर्गणी व पालिकेच्या सहकार्यातून छत्रपती शिवाजीराजेंचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. आठशे किलो पंचधातू व ब्रॉस पुतळा बनवणेसाठी वापरले आहे. यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले,‘शिवाजीराजेंकडून संस्कार, धाडस, नीतीमत्ता,महिलांचा सन्मान हे गुण घ्यावेत. चांगले स्मारक म्हणून विशाळगडचे नाव जगभर होण्यासाठी सर्वजण एकत्र येऊ.’
खासदार धैर्यशील माने म्हणाले, ‘तरूणांनी वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांच्या विचारांचा जागर करावा.’ आमदार विनय कोरे म्हणाले, ‘येथील छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा उभारून पालिका निवडणुकीत दिलेला वचननामा पूर्ण केला.’ यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती सर्जेराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड, विजयसिंह देसाई, उदयराजे, क्षितीजाराजे पंतप्रतिनिधी, पुतळा समितीचे अध्यक्ष प्रवीण प्रभावळकर, माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, सुहास पाटील, शामराव कारंडे, प्रकाश पाटील, मुख्याधिकारी विद्या कदम आदींसह तरुण मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

चौकट
४५ वर्षांनी स्वप्नपूर्ती
सुभाष चौकात छत्रपती शिवरायांचा पुतळा असावा असा पहिला ठराव पालिकेत १९७८ मध्ये केला होता. दोन वर्षांपूर्वी पुन्हा तसा ठराव पालिकेने केला. अखेर ४५ वर्षानी मलकापूरवासीयांचे स्वप्न पूर्ण झाले.