विशाळगड येथील उत्सवा संदर्भात खोटी अफवा ६ जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशाळगड येथील उत्सवा संदर्भात खोटी अफवा ६ जणांना अटक
विशाळगड येथील उत्सवा संदर्भात खोटी अफवा ६ जणांना अटक

विशाळगड येथील उत्सवा संदर्भात खोटी अफवा ६ जणांना अटक

sakal_logo
By

तेढ निर्माण करणाऱ्या
सहाजणांना अटक
शाहूवाडी : विशाळगड येथील महाशिवरात्री उत्सवाबाबत खोटी माहिती व अफवा पसरवणे, प्रक्षोभक घोषणा देणे, खोडसाळपणे नुकसान करून हिंदू - मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करणे आदी कारणांवरून शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्या तपासावरून रविवारी रात्री उशिरा सहाजणांना अटक करणेत आली. अरुण बाळू इंजुलकर, रोहित सर्जेराव कुरणे, प्रवीण तुकाराम मांडवकर (सर्व रा. कळे ता.पन्हाळा) सिध्दार्थ धोंडीबा कटकधोंड (रा. जवाहरनगर), सुहास परशुराम शिंदे, (शिवाजी पेठ) , महेश गोविंद पवार (रंकाळा, सर्व कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, महाशिवरात्री दिवशी विशाळगडवरील झेंडा चौकात हिंदू व मुस्लीम समाजाने एकत्र येत उत्सव साजरा केला. दोन्ही समाजात येथे सलोखा आहे. मात्र अरूण इंजुलकर, रोहित कुरणे, प्रवीण मांडवकर, सिध्दार्थ कटकधोंड, सुहास शिंदे, महेश पवार यांनी हिंदू व मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणेच्या उद्देशाने खोटी व चुकीची माहिती पसरवली. त्यानुसार गुन्हा नोंद झाला होता. तपासाअंती वरील सहा जणांना शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. खोटी अफवा पसरवून कोणी तेढ निर्माण करू नये; असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी केले.