शाहूवाडी गावात पाण्याचा ठणठणाट, गेली दहा दिवस पाणी नाही . | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहूवाडी गावात पाण्याचा ठणठणाट, गेली दहा दिवस पाणी नाही .
शाहूवाडी गावात पाण्याचा ठणठणाट, गेली दहा दिवस पाणी नाही .

शाहूवाडी गावात पाण्याचा ठणठणाट, गेली दहा दिवस पाणी नाही .

sakal_logo
By

1944
शाहूवाडीः येथील बेघर वसाहतीत रविवारी टँकरवर पाणी भरण्यासाठी झालेली गर्दी.
....

शाहूवाडीत पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट

दहा दिवसांपासून पाणी नाहीः आज महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा

शाहूवाडी, ता.५ ः शाहूवाडी या तालुक्याच्या गावात गेल्या दहा दिवसांपासून पाणी नाही. त्यामूळे ३५० ते ५०० रुपये टँकर असे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ऐन सणात पाणी नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. उद्या, सोमवारी (ता.६) ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून नागरिक प्रशासनाला जाब विचारणार आहेत.
शाहूवाडी या तालुका ठिकाणच्या गावात पाणी, रस्ते, गटर्स, अस्वच्छता, रस्त्यावरची वीज अशा अनेक समस्या आहेत. नागरिकांना मुलभूत सेवा सुविधा मिळत नाहीत. पिण्याच्या पाण्याची येथील समस्या तर गावच्या पाचवीलाच पुजली आहे. कडवी नदीवरील कोट्यवधी रुपयांची जलशुध्दीकरण योजना पूर्णतः कुचकामी ठरली आहे. तर सध्या गावाला पाणीपुरवठा करणारी शाळी नदीवरील कोळगांव हद्दीतील व आंबर्डी नदीवरील नळपाणी योजना गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी अपुरी पडत आहे. त्यामूळे संपूर्ण गावात एका दिवसाआड अपुरा पाणी पुरवठा सुरु आहे. गेल्या दहा दिवसांपासून तोही बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. ३५० ते ५०० रुपये टँकर असा दर असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर त्यामुळे तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. गावच्या चनवाड व गणेशनगर या भागांची पिण्याच्या पाण्याची अवस्था याहून वेगळी नाही.
...

‘ गेली दहा दिवस पाणी नाही. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. सध्या मी बेघर वसाहतमध्ये स्वखर्चाने टँकर दिला आहे. पण पाणीपट्टी घेता, मग पाणी का नाही याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी आम्ही ग्रामपंचायतीवर मोर्चाने जाणार आहोत.

आश्विनी म्हापसेकर, महिला बचत गट प्रमुख
...

‘ गावच्या कोणत्याही प्रश्नाबाबत ग्रामपंचायतीत गेले असता प्रशासन दाद देत नाही. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. मग आम्ही दाद मागायची कोणाकडे ?

सरिता कवळे, माजी उपसरपंच, शाहूवाडी
...

‘ गावाला पाणी पुरवठा करणारे कोळगांव हद्दीतील जॅकवेलच्या दुरूस्तीचे काम सुरु होते. आंबर्डी नदीवरील जॅकवेलमध्ये पाणीसाठा अत्यंत कमी होत असल्याने गावाला पाणीपुरवठा होत नाहता. उद्यापासून पाणी पुरवठा सुरळीत होईल.

डी. ए. जाधव, ग्रामसेवक तथा प्रशासक, ग्रामपंचायत शाहूवाडी