शाहूवाडी शैक्षणिक व्यासपीठ कार्यक्रम

शाहूवाडी शैक्षणिक व्यासपीठ कार्यक्रम

Published on

02124
शाहूवाडीत गुणवंतांचा सत्कार
शाहूवाडी : ग्रामीण भागातील तरूण प्रशासकीय सेवेत यावेतए त्यासाठी त्यांना प्राथमिक शाळा स्तरावर शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षाचे बाळकडू मिळण्यासाठी शिक्षकांनी कार्यरत राहावे, असे
आवाहन तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी केले. तालुका शैक्षणिक व्यासपीठातर्फे वीर बाजीप्रभू गुणवत्ता शोध परीक्षेतील गुणवंतांच्या गौरवप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी जयश्री जाधव होत्या. यावेळी आयपीएसपदी निवडीबद्दल आशीष पाटील (साळशी) यांचा सत्कार झाला. वीर बाजीप्रभू गुणवत्ता शोध परीक्षेतील २२२ विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविले. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सभापती सर्जेराव पाटील,अध्यक्ष एम. आर. पाटील, प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन सुनील एडके, भारत पाटील, साक्षी एडगे, भरतेश कळंत्रे, उद्योगपती बाबूराव सागावकर, शशिकांत पाटील, नंदकुमार शेळके, भरतेश कळंत्रे, शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी रोडे-पाटील, नगरसेवक सुहास पाटील, केंद्रप्रमुख सदाशिव थोरात, शिवराम मावचींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.