शाहूवाडी ग्रामपंचायत कारभार भाडयाच्या इमारतीत

शाहूवाडी ग्रामपंचायत कारभार भाडयाच्या इमारतीत

Published on

02152

शाहूवाडी ग्रामपंचायत
इमारत धोकादायक
भिंतींना भेगा; कारभार भाड्याच्या खोलीतून

शाहूवाडी, ता. १७ ः तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या शाहूवाडीच्या ग्रामपंचायत इमारतीची दुरवस्था झाली आहे. इमारतीचे छत ढासळू लागल्याने व भिंतींना मोठ्या भेगा पडल्याने इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायतीचा कारभार भाड्याच्या इमारतीमधून सुरू आहे.

१९५६ मध्ये येथे ग्रामपंचायतीची स्थापना झाली. त्यावेळी शाहूवाडीबरोबरच करंजोशी, ससेगाव, मोळवडे गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत होती.त्यानंतर स्वतंत्र ग्रामपंचायती झाल्या.गावच्या मध्यवस्तीत ग्रामपंचायतीची दोन खोल्यांची छोटी इमारत आहे. एक खोली अडगळीने भरली आहे. दुसऱ्या खोलीत कारभार चालत होता. इमारत जुनी झाल्याने आणि डागडुजी वेळेवर करण्यात न आल्याने इमारतीचे छ्त ढासळू लागले आहे. भिंतींना भेगा पडल्या आहेत. त्यामूळे कोणत्याही क्षणी इमारत कोसळू शकेल अशी अत्यंत धोकादायक अवस्था इमारतीची झाली आहे.
त्यामूळे पंधरा दिवसापासून एका भाड्याच्या इमारतीमधून ग्रामपंचायतीचा कारभार चालू झाला आहे.येथे नगर पंचायत व्हावी यासाठी ग्रामस्थांनी निवडणूकीवर बहिष्कार घातला आहे.त्यामूळे प्रशासकच सध्या कारभार हाताळत आहेत.

चौकट-
लोकप्रतिनिधींचा निष्काळजीपणा
ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी म्हणून अनेकजण कारभारी झाले. सत्ता भोगली. मात्र इमारतीची दुरवस्था झाली. ती पूर्णतः कोसळण्याच्या स्थितीत आली तरी कोणाही लोकप्रतिनिधींने नव्या इमारतीसाठी पाठपुरावा का केला नाही; याबाबत ग्रामस्थांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

कोट
ग्रामपंचायत इमारत धोकादायक झाल्याने १८०० रुपये मासिक भाड्याने खोली घेतली आहे.धोकादायक इमारत निर्लेखित करणेस मंजुरी मिळाली आहे. नव्याने इमारत होणेसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.
-दत्तात्रय जाधव - ग्रामसेवक; शाहूवाडी

तालुका ठिकाणच्या ग्रामपंचायती इमारतीची ही अवस्था लांचनास्पद आहे.सत्ताधाऱ्यांनी केवळ भ्रष्ट कारभार केला. गावच्या रस्त्यांची,गटारांची,नळपाणी योजनेची आणि गावच्या एकूण विकासाची अवस्था वाईट आहे.
- चंद्रकांत म्हापसेकर -ज्येष्ठ नागरिक; शाहूवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.