मलकापूरात मेडिकल व बेकरीत चोरी सात हजाराचा मुद्देमाल लंपास

मलकापूरात मेडिकल व बेकरीत चोरी सात हजाराचा मुद्देमाल लंपास

मलकापूरला चोरांनी ७ हजारांची रोकड पळविली
मलकापूर : येथील मंगळवार पेठेतील केदार कुमार कामेरकर यांच्या कांचन जनरल स्टोअर्स व बेकरीत आणि सद्‌गुरू मेडिकलमध्ये चोरट्याने डल्ला मारून ६ हजार ९०० रुपये पळविले. रात्री उशिरा चोरी झाली. याबाबतची तक्रार केदार कामेरकर यांनी दिली. पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, केदार कामेरकर यांचे उचत रस्त्यावर कांचन जनरल स्टोअर्स व बेकरी आहे. चोरटयांने मंगळवारी रात्री या दुकानात व सदगुरू मेडिकलच्या शटरचे कुलूप उचकटून ६ हजार ९०० रुपयांची रोकड पळविली. बुधवारी सकाळी दुकान उघडणेस गेले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान चार दिवसांपूर्वी येळाणेत रस्त्याकडेला लावलेली दुचाकी चोरीस गेली आहे. आठवडाभरापूर्वी शाहूवाडीत मेडिकलमधील दहा हजारांची रोकड अज्ञाताने पळविली. वाढत्या चोऱ्यांबाबत मलकापूर, शाहूवाडी, येळाणे परिसरात भीतीचे वातावरण आहे. येथे पालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. दीड वर्षापासून ते बंद आहेत. ते सुरू करावेत, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com