पेरीड येथे जीवेचा खांब धोकादायक

पेरीड येथे जीवेचा खांब धोकादायक

Published on

02615
पेरीड (ता. शाहूवाडी) : येथील गावच्या मुख्य चौकातील विजेचा लोखंडी खांब गंजल्यामुळे धोका वाढला आहे.

गंजलेल्या वीज खांबामुळे धोका
पेरीडच्या मुख्य चौकातील स्थिती; तक्रारीकडे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
शाहूवाडी, ता. ८ : पेरीड (ता. शाहूवाडी) येथील गावच्या मुख्य चौकातील विजेचा लोखंडी खांब गंजल्यामुळे कधीही कोसळू शकेल, अशा अत्यंत धोकादायक स्थितीत उभा आहे. ग्रामस्थांनी याबाबत वारंवार महावितरणच्या कार्यालयाकडे तक्रार केली. मात्र, अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे दुर्घटना घडलेनंतरच महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का?, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
पेरीड गावच्या मुख्य चौकात ग्रामपंचायतीच्या समोर विजेचा लोखंडी खांब आहे. त्यावरून गावतील कांही लोकांना वीज जोडण्या देणेत आल्या आहेत. गावच्या पथ दिव्याची छोटी पेटीही याच खांबावर आहे. शिवाय गावचा मुख्य चौक असल्याने येते वाहनांची वर्दळही येथे अधिकच असते. तारांचा मोठा भार असणारा हा खांब तळातून पूर्णपणे गंजून गेला आहे. कोणत्याही क्षणी तो कोसळू शकेल, अशी धोकादायक स्थिती आहे. यासाठी काही जागरूक ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयात याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत; पण त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ऐन पावसात व वादळ वाऱ्यात कसाबसा उभा असणारा हा खांब महावितरणने तातडीने बदलणे गरजेचे आहे.
--------------
कोट
पेरीडच्या मुख्य चौकातील विजेचा लोखंडी खांब गंजला असून धोकादायक झाल्याची वस्तूस्थिती आहे. तो बदलेसाठी दोन वेळा खासगी ठेकेदारांना पाठवले होते; पण कठीण खडकांमुळे खड्डा काढता आलेला नाही. नवीन खांब येथे नेलेला आहे. ब्रेकरने खड्डा काढून दोन दिवसांत काम करणार आहे.
- रोहित काटकर, शाखा अभियंता, मलकापूर
-----------------
कोट
गावच्या मुख्य चौकातील खांब गंजून सडला आहे. तो तुटून पडण्याची भीती आहे. महावितरणकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत; पण काम केलेले नाही.
- रवींद्र पाटील, ग्रामस्थ पेरीड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.