निर्देशांकांची तिसरी पडझड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांकांची तिसरी पडझड
निर्देशांकांची तिसरी पडझड

निर्देशांकांची तिसरी पडझड

sakal_logo
By

निर्देशांकांची तिसरी पडझड
मुंबई, ता. ६ ः जागतिक अर्थव्यवस्थेच्या हादऱ्यांमुळे जगातील अन्य शेअर बाजारांचे अनुकरण करीत भारतीय शेअर बाजार आज (ता.६) तिसऱ्या दिवशीही कोलमडले. ४५२.९० अंश कोसळलेला सेन्सेक्स साठ हजारांच्या खाली आला. तर निफ्टी देखील १३२.७० अंशांनी कोलमडला.
आज मुख्यतः जागतिक कारणांमुळेच भारतीय शेअरबाजार निर्देशांक घसरले. रशियाचा युद्धबंदीचा प्रस्ताव आज युक्रेनने फेटाळला. तर अमेरिकी ‘फेड’च्या कठोर भूमिकेचे पडसादही उमटले. त्यातच दक्षिण आशियातील चलनवाढीबद्दल रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चिंता व्यक्त केल्यामुळे नकारात्मक वातावरणात भर पडली. आज व्यवहार सुरू झाल्यापासूनच निर्देशांक तोट्यातच होते आणि उत्तरोत्तर तो तोटा वाढतच गेला. दिवस अखेरीस सेन्सेक्स ५९,९००.३७ अंश तर निफ्टी १७,८९५.४५ अंशावर स्थिरावला.
गुरुवारी (ता.५) रात्री अमेरिकी शेअर बाजारात पडझड झाल्यामुळे आज सकाळी आशियाई शेअर बाजारही संमिश्र कौल दाखवत होते. त्यामुळे भारतीय शेअर बाजारांमध्येही मोठी विक्री झाली. आयटी क्षेत्राचे शेअर्स तसेच अर्थसंस्थांच्या शेअरमध्ये जोरदार विक्री झाली. त्यामुळे त्यांचे भाव जास्त कोसळले. त्यातच परदेशी वित्तसंस्थांची विक्री सुरूच राहिल्याने पडझडीत भर पडली. गेल्या नऊ सत्रांमध्ये परदेशी वित्तसंस्थांनी साडेदहा हजार कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. आज एफएमसीजी सोडून सर्व क्षेत्रे तोटा दाखवीत होती. निफ्टीवरील टीसीएस, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक, बजाज फिन्सर्व्ह, टेक महिंद्र हे शेअर सर्वात जास्त कोसळले.