
बंगळूरचे आव्हान कायम
दणदणीत विजयासह
बंगळूरचे आव्हान कायम
सोफी डेव्हिनचे शतक एका धावेने हुकले
मुंबई, ता. १८ ः ‘करो या मरो’ अशा वाटेवर उभ्या असलेल्या बंगळूर संघाने गुजरातवर ८ विकेटने दणदणीत विजय मिळवून महिला प्रीमियर लीगमधील आव्हान कायम ठेवले. झंझावाती खेळी करणाऱ्या सोफी डेव्हिनचे शतक एका धावेने हुकले.
स्पर्धेतले आव्हान कायम ठेवायचे, तर केवळ विजय नव्हे, तर सरासरीही उंचावण्याची गरज असलेल्या बंगळूर संघाने १८९ हे मोठे आव्हान १५.२ षटकातच पार केले. सोफी डेव्हिनने ३६ चेंडूत तब्बल २७५ च्या स्ट्राईक रेटने ९९ धावा टोलावल्या. यात तिने ९ चौकार आणि ८ षटकार मारले. फॉर्म सापडलेल्या स्मृती मानधनाने ३१ चेंडूत ३७ धावा केल्या. या दोघांनी ९.२ षटकांत १२५ धावांची सलामी दिली.
तत्पूर्वी लौरा व्हॉलवर्ट (६८) आणि अॅशले गार्डनर (४१) यांच्या फटकेबाजीमुळे गुजरात संघाने २० षटकांत ४ बाद १८८ धावा केल्या; परंतु विजयासाठी त्या पुरेशा ठरल्या नाहीत.
संक्षिप्त धावफलक ः गुजरात जायंट्स ः २० षटकांत ४ बाद १८८ (लौरा व्हॉलवर्ट ६८ - ४२ चेंडू, ९ चौकार, २ षटकार, एस. मेघना ३१ - ३२ चेंडू, ४ चौकार, अॅशले गार्डनर ४१ - २६ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, दयालन हेमलता नाबाद १६ -६ चेंडू, २ चौकार, १ षटकार, हर्लिन देओल नाबाद १२ -५ चेंडू, १ चौकार, १ षटकार, सोफी डेव्हिन ३-०-२३-१, श्रेयांका पाटील २-०-१७-२) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ः १५.३ षटकांत २ बाद १८९ (स्मृती मानधना ३७ - ३१ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, सोफी डेव्हिन ९९ -३६ चेंडू, ९ चौकार, ८ षटकार, एलिस पेरी नाबाद १९, हेथर नाईट नाबाद २२, किम ग्रेथ ४-०-३२-१)