ऑस्ट्रेलिया - दक्षिण आफ्रिका... महिला टी-२० विश्‍वकरंडक...

ऑस्ट्रेलिया - दक्षिण आफ्रिका... महिला टी-२० विश्‍वकरंडक...
Published on: 

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात
महिला टी-२० विश्‍वकरंडक; दक्षिण आफ्रिका सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत
दुबई, ता. १७ : सहा वेळा चॅम्पियन ठरलेल्या आणि गतविजेता असलेल्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाला गुरुवारी महिलांच्या टी-२० विश्‍वकरंडकात पराभवाचा धक्का बसला. गतवेळच्या उपविजेता दक्षिण आफ्रिकन महिला संघाने ऑस्ट्रेलियावर आठ विकेट व १६ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आणि सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.
ऑस्ट्रेलियाकडून दक्षिण आफ्रिकन संघासमोर विजयासाठी १३५ धावांचे आव्हान उभे ठाकले. सलामी फलंदाज लॉरा वॉलवार्ड्‌ट हिने ४२ धावांची आणि ॲनेक बॉच हिने नाबाद ७४ धावांची खेळी साकारत दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी दक्षिण आफ्रिकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघाला पाच बाद १३४ या धावसंख्येवर रोखण्यात त्यांना यश मिळाले. बेथ मुनीने ४४ धावांची, तहलिया मॅग्राने २७ धावांची, एलिस पेरीने ३१ धावांची खेळी साकारली. एयाबोंगा खाका हिने दक्षिण आफ्रिकन संघाकडून दोन फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया - २० षटकांत पाच बाद १३४ धावा (बेथ मुनी ४४, तहलिया मॅग्रा २७, एलिस पेरी ३१, एयाबोंगा खाका २/२४) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका १७.२ षटकांत दोन बाद १३५ धावा (लॉरा वॉलवार्ड्‌ट ४२, ॲनेक बॉच नाबाद ७४, ॲनाबेल सदरलँड २/२६).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.