मुरगूड : सीटू राज्य अधिवेशन.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरगूड : सीटू राज्य अधिवेशन....
मुरगूड : सीटू राज्य अधिवेशन....

मुरगूड : सीटू राज्य अधिवेशन....

sakal_logo
By

03372
मुरगूड : येथे अधिवेशनात बोलताना डॉ. सुनीलकुमार लवटे. व्यासपीठावर मान्यवर.
----------------

कष्टकऱ्यांकडून संघटित संघर्षाची गरज

डॉ. सुनीलकुमार लवटे; सिटू राज्य अधिवेशनाचा दुसरा दिवस

मुरगुड, ता. ७ : कायदे निष्प्रभ होत गेल्याने कामगार, शेतकरी, शेतमजूर वर्गाचे जीवन हलाखीचे बनत आहे. कष्टकरी वर्गाने संघटन मजबूत करून संघर्ष तीव्र करण्याचे आवाहन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
येथील कॉ. महेंद्रसिंगनगरमधील कॉ. उध्दव भवलकर सभागृहात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू)च्या १६ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड होते.
डॉ. लवटे म्हणाले, ‘जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरणाने कामगार, कष्टकरीच नाही तर नोकरदार मध्यमवर्गीयांचे जगणेच कठीण केले आहे. वर्क फ्रॉम होमचा फंडा जगभर अस्तित्वात आल्याने बुद्धिजीवी समाज नवभांडवलदारी व्यवस्थेने रोजंदारी बनवून टाकला आहे. शोषणाविरोधात जगणं सुसह्य व समृद्ध करण्यासाठी संघर्ष करा.’
यावेळी राष्ट्रीय महासचिव, माजी खासदार कॉ. तपनसेन म्हणाले, ‘कामगार, कष्टकऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करा, अशी मागणी केल्यावर मोदी सरकार पैसे नाहीत असं सांगतंय. पण कार्पोरेट मित्रांना व भांडवलदारांना कर्जमाफी, करसवलतीव्दारे १५ लाख कोटी रुपये दिले. हा पैसा जनतेचा आहे. जनतेचे खरे प्रश्न बाजूला सारण्यासाठी धर्मांधता व जातीभेदाचे विष पसरविले जात आहे. म्हणून कामगार कष्टकऱ्यांनी २०२४ मध्ये भाजपा सरकारचा पराभव करावा.’
अधिवेशनात प्रतिनिधींनी तीन वर्षे केलेल्या कामाचे टीकात्मक अवलोकन करून कोणत्या उणिवा राहिल्या ते स्पष्ट करून त्यावर मात करण्याचे नियोजन मांडण्याचे आवाहन सेन यांनी केले. महासचिव एम. एच. शेख यांनी कार्याचा अहवाल तर खजिनदार के आर. रघु यांनी जमाखर्च मांडला.