
बीएससी नर्सिंग महाविद्यालयाची मान्यता.
मुरगूडला ‘बीएससी नर्सिंग’ला
मान्यता : खासदार प्रा. मंडलिक
मुरगूड ता. १६ : येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटीच्या सदाशिवराव मंडलिक इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या बी.एस्सी. नर्सिंग या चार वर्षांच्या अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मान्यता दिल्याची माहिती खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२०२२- २०२३ पासून ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या महाविद्यालयास डोंगरी भागासाठी विशेष बाब म्हणून मान्यता मिळाली आहे. ४ वर्षांच्या पदवीनंतर शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रात कामाची संधी मिळणार असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले. ३१ शाखांतून ८ हजार विद्यार्थी शिकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. गिरीश महाजन, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर व आमदार प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्यामुळे मान्यता मिळाली. चंदगड राधानगरी, भुदरगड ,गडहिंग्लज, आजरा व कागल तालुक्यातील दुर्गम व डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना यातून नोकरी, रोजगार व व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल. यासाठी कार्याध्यक्ष अॅड. वीरेंद्र मंडलिक, अध्यक्ष गजाननराव गंगापूरे ,डॉ. प्रसाद फुटाणे, डॉ. रवींद्र हत्तरगी, डॉ. रणजीत कदम, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. बेळगुंद्रींसह अनेकांचे सहकार्य लाभले.
प्रवेश प्रक्रिया...
बारावी विज्ञान उत्तीर्णांना केंद्र शासनाच्या ‘नीट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे केंद्रीय पद्धतीने जून २०२३ पासून प्रवेश दिला जाईल.