
गर्भवती महिलेने दिला रस्त्यातच बाळाला जन्म.
03486
यमगेनजीक गर्भवती
रस्त्यातच प्रसूत
निपाणी - फोंडा राज्यमार्गावरील घटना
मुरगूड, ता. ४ : निपाणी-मुरगूड मार्गावरील प्रचंड प्रमाणातील खड्डयांमुळे यमगेनजीक मध्यप्रदेशातून ऊस तोडणीसाठी आलेल्या कुटुंबातील महिलेची प्रवासादरम्यान रस्त्यातच प्रसूती झाली.
कासेगाव येथील ३२ जण रयत कारखान्याकडे ऊसतोडणीचे काम करत होते. गुरुवारी सायंकाळी ते हंगाम संपवून तिरवडेतील (ता. भुदरगड) ट्रॅक्टरमालक सूरज नांदेकर यांचेकडे दोन छकड्यांमधून जात होते. तेथून ते मध्यप्रदेशला जाणार होते. रात्री कोल्हापूरनजीक मुक्काम करून गुरुवारी तिरवडेकडे निघाले. यात मध्यप्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील खारी गावची सौ. किरण केसू पालवी ही गर्भवती ऊसतोड मजूर महिला छकडीमधून प्रवास करत होती. या मार्गावरील रस्त्याची दुरवस्था, मोठमोठे खड्डे आणि छकडीतील प्रवासामुळे यमगेजवळ किरण पालवी यांच्या पोटात दुखायला लागले. सूरज नांदेकर यांना ही माहिती दिली. त्यांनी १०८ रुग्णवाहिकेस कॉल केला. दरम्यान जास्त वेदना होत असल्याने महिलांनी बेडशीटचा आडोसा केला आणि महिलेने मुलग्यास जन्म दिला. हे समजताच यमगेतील सरिता एकल, सुनीता पाटील, सुनीता कांबळे आणि यमगे उपकेंद्राच्या रुपाली लोकरे घटनास्थळी आल्या. तोपर्यंत कापशीहून १०८ रुग्णवाहिका दाखल झाली.आरोग्य विभागाने प्रथमोपचार केले. पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून मुरगूड ग्रामीण रुग्णालयात नेले.