निढोरीतील आयोजकांवर गुन्हा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निढोरीतील आयोजकांवर गुन्हा..
निढोरीतील आयोजकांवर गुन्हा..

निढोरीतील आयोजकांवर गुन्हा..

sakal_logo
By

घोडागाडी शर्यत, निढोरीतील आयोजकांवर गुन्हा

मुरगूड : निढोरी (ता.कागल) येथे विनापरवाना घोडागाडी शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांवर मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, निढोरी येथे विशाल जोतिराम रंडे व सागर संभाजी साठे (दोघेही रा.निढोरी,ता.कागल) यांनी निढोरी - भडगाव रोडवर कोणतीही शासकीय परवानगी न घेता बेकायदेशीर, विनापरवा घोडागाडी शर्यत शुक्रवारी (ता.१०) सकाळी ८ वाजता आयोजित केली होती. यावेळी या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरण्यात आली होती. सार्वजनिक वाहतूक रोखून धरत या मार्गावरील प्रवाशांच्या धोका निर्माण होईल, अशा रितीने शर्यतीचे आयोजन केल्याच्या कारणावरुन रंडे व साठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.