फसवणूकीचा गुन्हा.

फसवणूकीचा गुन्हा.

खोट्या कागदपत्रांच्या आधारे
१ लाख ६८ हजारांची फसवणूक

मुरगूड, ता.१ : बनावट सह्या करुन खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या मंजूर ठिबक सिंचन योजनेचा गैरफायदा व आर्थिक अपहार करण्याच्या उद्देशाने बनावट ठिबक सिंचन अनुदान प्रकरण तयार करुन नानीबाई चिखली (ता. कागल) येथील संशयित आरोपी राजेंद्र यलगोंडा नुल्ले व सौ. संगीता राजेंद्र नुल्ले यांनी सुमारे १ लाख ६८ हजार ९१ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सौ. अनिता रविंद्र नुल्ले यांनी मुरगूड पोलिसांत दिली आहे. त्यानुसार नुल्ले पती पत्नींवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार अनिता रविंद्र नुल्ले व संशयीत आरोपी राजेंद्र यलगोंडा नुल्ले व संगीता राजेंद्र नुल्ले हे नात्याने दीर व जाऊ आहेत. २०१४ ते २०१६. या कालावधीत बनावट ठिबक सिंचन अनुदान प्रकरण तयार करुन अनिता नुल्ले, पती रविंद्र यलगोंडा नुल्ले यांच्या नावावर स्टँप खरेदी करून त्यावर त्याच्या बनावट सह्या करून त्या स्टॅम्पवर ठिबक सिंचन योजनेचा लाभ आपल्या नावावर मिळण्याचा मजकूर तयार करून बनावट प्रकरण तयार केले. त्यावर बनावट सह्या करून त्यांच्या नावाच्या बनावट व्यक्ती उभ्या करून खोटी कागदपत्रे खरी म्हणून शासन दरबारी सादर केली. प्रकरणे मंजूर करुन घेवून त्या रक्कमा बँक खात्यातून चेकद्वारे व स्लिपवर बनावट सह्या करून शासन वतक्रारदार यांची फसवणूक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com