नातवंडासोबत सोबत साजरा केला विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा

नातवंडासोबत सोबत साजरा केला विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा

Published on

03789
नातवंडांसोबत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
मुरगूड विद्यालय; तब्बल ३८ वर्षांनी भरला वर्ग

मुरगूड; ता. १० : ज्या शाळेत शिक्षणाचे धडे घेवून अनेक ठिकाणी चांगल्या सेवा करुन निवृत्त झालेले, विविध पदांवर कार्यरत असणारे मुरगूड विद्यालयाच्या १९८४- ८५ मधील दहावीच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींचा ३८ वर्षांनंतर नव्याने वर्ग भरला. या वर्गात कुटुंबातील व्यक्तींसह बऱ्याच जणांची नातवंडेही सहभागी होती.
गुरुजनांचे पाद्यपूजन करुन विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्यास सुरुवात केली. मृत वर्गमित्र, शिक्षक, शिक्षिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. आज वर्गात शिक्षकांचे कोणत्याही विषयांचे तास नव्हते. तर जीवनाला आकार देणाऱ्या संस्कारित करणाऱ्या शाळा व शिक्षकांबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे, शालेय जीवनातील गमती - जमती, शाळेला मारलेल्या दांडया त्याबद्दल मिळालेला शिक्षेचा प्रसाद या व अशा असंख्य आठवणींना उजाळा मिळाला.
माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी स्वागत व प्रास्ताविकात शालेय जीवनातील आठवणी जागवल्या. शिक्षकांचा यथोचित सत्कार केला. तत्कालीन प्राचार्य शिवाजी सावंत यांच्या धाकात विद्यार्थी आजही असल्याचे जाणवले. ३८ वर्षानंतर भेटलेले माजी विद्यार्थी - विद्यार्थिनीच्या स्नेहमेळाव्यात जून्या वर्गमित्र - मैत्रिणींनी आपल्या शाळेतील जून्या स्मृतीनां उजाळा देत गळाभेटीने आनंद व्यक्त केला. यावेळी माजी प्राचार्य शिवाजी सावंत, शिक्षक चंद्रकांत माळवदे, प्राचार्य एस. आर. पाटील, विद्यार्थी प्रशांत शहा, अशोक पाटील, दत्तात्रय क्षीरसागर, बाबू रणवरे, संजीव तोरसे, मंजूषा गाडगीळ, सुनीता पाटील आदींची भाषणे झाली. रणजीत कदम यांच्या संगीत मैफलाचा आस्वाद घेत स्नेहभोजनाने सांगता झाली. स्नेहमेळाव्यास वि. रा. घाटगे,आर. एच. पोळ, पी. डी. पाटील, श्री. इंदलकर, श्री. कोरे, एकनाथ देशमुख आदींसह विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. अशोक पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.