सांस्कृतीक हॉलमधील गैरप्रकार रोखा,

सांस्कृतीक हॉलमधील गैरप्रकार रोखा,

04458
मुरगूड : नगरपालिका प्रशासनास निवेदन देताना जोतिराम सूर्यवंशी आदी.
.....
गैरप्रकार रोखा, सांस्कृतिक हॉल
वाचनालयासाठी वापरायला द्या

मुरगूडमधील नागरिकांची मागणी; नगरपालिका प्रशासनास निवेदन

सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. ५ : येथील गोपाळराव सूर्यवंशी-पाटील नगरातील नगरपरिषदेच्या मालकीच्या खुल्या जागेतील इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याठिकाणी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ही इमारत वाचनालयास वापरायला द्यावी, या मागणीचे निवेदन नागरिकांनी नगरपालिका प्रशासनास दिले.
निवेदनात म्हटले आहे की, दहा वर्षांपूर्वी नगरपालिकेकडून कॉलनीच्या खुल्या जागेवर सांस्कृतिक हॉल बांधला आहे; पण ही इमारत सध्या पूर्णतः जीर्ण झाली आहे. तिची पडझड झाली असून, दरवाजे, खिडक्या चोरीस गेल्या आहेत. इमारतीचा काही विद्यार्थी, गांजा ओढणारे युवक, समाजविघातक लोक गैरवापर करत आहेत. परिणामी त्याचा कॉलनीतील लोकांना नाहक त्रास होत आहे. इमारतीची डागडूजी येथील शासनमान्य श्रीमान गोपाळराव सूर्यवंशी-पाटील वाचनालय स्वखर्चाने करण्यास तयार आहे. ही इमारत वाचनालयास अभ्यासिका सुरू करण्यासाठी तसेच वाचनालयाच्या अन्य उपक्रमांसाठी द्यावी; जणेकरून इमारत सुस्थितीत राहून गैरप्रकार रोखले जातील. तसेच नगरपालिकेवर आर्थिक भार पडणार नाही.
नगरपलिका प्रशासनास जोतिराम सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. सुधीर सावर्डेकर, सर्जेराव भाट, जगदीश गुरव यांनी निवेदन दिले. पालिकेचे अभियंता प्रकाश पोतदार यांनी ते स्वीकारले. निवेदनावर जोतिराम सूर्यवंशी, राजाराम सावर्डेकर, नारायण कांबळे, दिनकर लोकरे, मंगल व्हरांबळे, के. ए. म्हेत्तर, मनीषा आरडे, सुमन पोळ, डॉ. हृषिकेश माळवदे, सविता पारशवाड, रेखा सावर्डेकर, साईराज मेटकर, र. शा. पालकर आदींच्या सह्या आहेत.
...............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com