
कळंबा येथील युवकाची दऱ्याचे वडगाव येथे गळपास घेऊन आत्महत्या
फोटो
....
कळंब्यातील युवकाची आत्महत्या
दऱ्याचे वडगाव, ता.१४ ः येथील पारख डोंगर येथे अजित युवराज साठे (वय २९, रा.कात्यायनी फाटा, कळंबा) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत इस्पुर्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अजित साठे हा दारू पिऊन घरी आल्याने त्याची पत्नी त्याच्यावर रागावली. त्यानंतर तो दुपारी घरातून काही न बोलता निघून गेला होता. याबाबत त्याच्या घरच्यांकडून करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. दरम्यान, आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दऱ्याचे वडगाव गावच्या हद्दीतील पारख डोंगर येथे शिसमच्या झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
अजित हा हॉटेलमध्ये मिळेल ते काम करत होता, तर वडील युवराज हे प्लबिंगचे काम करतात. च्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, लहान भाऊ व आई-वडील असा परिवार आहे.