Mon, Feb 6, 2023

हणबरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी कॉंग्रेसचेअरविंद खोत बिनविरोध
हणबरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी कॉंग्रेसचेअरविंद खोत बिनविरोध
Published on : 16 January 2023, 1:26 am
00239
हणबरवाडी उपसरपंचपदी अरविंद खोत
नंदगाव : हणबरवाडी (ता. करवीर) उपसरपंचपदी अरविंद शंकर खोत यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच आबासो उर्फ कुमार कोराणे यांच्या अध्यक्षतेखाली निवड झाली. निवडणूक निरीक्षक म्हणून आनंदराव आकुर्डेकर उपस्थित होते. ग्रामसेवक सचिन तारदाळे यांनी सभावृत्तांत वाचन केले व बिनविरोध निवड प्रक्रिया झाली. आमदार पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघाचे माजी संचालक अशोकराव खोत यांच्या नेतृत्वाखाली खोत-लवटे-कोराणे-वाडकर या संयुक्त ज्योतिर्लिंग आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवले. सभेला सदस्य रेखा लवटे, प्रणाली शिंदे, बाबुराव वाडकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलाबाची उधळण केली.