ठेकेदाराच्या दिरंगाई मूळ गटारीचे काम अपूर्ण : ग्रामस्थांमधून संताप व्यक्त

ठेकेदाराच्या दिरंगाई मूळ गटारीचे काम अपूर्ण : ग्रामस्थांमधून संताप व्यक्त

00597, 00596

नंदगावला गटारीचे काम अपूर्ण
ठेकेदाराची दिरंगाई ः त्वरित पूर्ण करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

नंदगाव, ता. २५ ः येथील मुख्य रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या गटारींचे काम अर्धवट अवस्थेत राहिल्याने व गटारी बंदिस्त नसल्याने डासांचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
नंदगावातून कोल्हापूरकडे जाणारा मुख्य रस्ता व दोन्ही बाजूच्या गटारींच्या कामास न्यू कॉर्नरनजीक १८० मीटर ६२ लाखांचा निधी मंजूर होता. गतवर्षी काम सुरु झाले. हा रस्ता न्यू कॉर्नरपासून दिंडोर्ले गल्ली व स्वराज मेडिकलपर्यंत पूर्ण होऊन गटारींचे कामही पूर्ण झाले आहे. ठेकेदाराच्या दिरंगाईने काम थांबले आहे. न्यू कॉर्नर चौकापासून पुढे येणारे पाणी गटारीचे काम थांबल्यामुळे साचत आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना व येथील दवाखान्यातील रुग्णांना त्रास होत आहे. काल पावसामुळे गटारीतील दुर्गंधीयुक्त पाणी मुख्य रस्त्यावरून वाहत होते. याबाबत ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत व संबंधित ठेकेदाराला वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष झाले आहे. गटार बंदिस्त नसल्याने मुले गटारात पडून जखमी झालेली आहेत. त्यामुळे गटारीचे काम त्वरित करावे, अशी मागणी उत्तम जगताप यांनी केली.

चौकट :
सरसकट अतिक्रमणे काढा
नंदगावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणे झाली आहेत. फक्त आमचेच अतिक्रमण का काढता? काढायचे असेल तर सर्वांची अतिक्रमणे काढा, असेही काही ग्रामस्थांनी प्रशासनाला सांगितल्याचे समजते.

कोट :
गटारी बांधण्यास अतिक्रमणांचा अडथळा आहे. अतिक्रमण काढल्यास काम सुरू करू. बंदिस्त गटारी, त्यावरील झाकण बजेटमध्ये नसल्यामुळे करू शकत नाही.
- शरद पाटील, ठेकेदार.

माझ्या मेडिकलच्या बाजूला हॉस्पिटल आहे. गटारीचे पाणी साचल्याने दुर्गंधी पसरून डासांचाही त्रास आहे. अतिरिक्त निधीतून गटारीचे काम त्वरित पूर्ण करावे.
-शहाजी गोनूगडे, मेडिकल दुकानदार,

ग्रामस्थांशी चर्चा केली असून अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्याबाबत ठेकेदाराला सूचना दिलेली आहे. लवकरच ठेकेदारांकडून कामास सुरुवात होईल.
- मारुती झांबरे, प्रभारी सरपंच नंदगाव,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com