म्हाळुंगेच्या उपसरपंचपदी सौ. दिपीका संतोष जाधव यांची बिनविरोध निवड*

म्हाळुंगेच्या उपसरपंचपदी सौ. दिपीका संतोष जाधव यांची बिनविरोध निवड*

00616
म्हाळुंगे उपसरपंचपदी
दीपिका जाधव
नंदगाव ः म्हाळुंगे (ता.करवीर) उपसरपंचपदी दीपिका जाधव यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच अनिलकुमार पाटील यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त होते. आमदार कै. पी एन पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निवडणूक प्रक्रियेस सुरवात केली. उपसरपंचपदासाठी एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच प्रमोद पाटील यांचे अध्यक्षतेखाली निवडप्रक्रिया झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी पांडुरंग बिडकर यांनी कामकाज पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, नंदकुमार मोरे, अनिलकुमार पाटील, लताताई चौगले, वैशाली सूर्यवंशी, शोभा कांबळे यांची उपस्थिती होती.

कै.आमदार पी.एन.पाटील यांच्या झालेल्या नुकत्याच निधनामुळे सदर निवडणूक प्रक्रिया ही अतिशय साध्या पद्धतीने पार पाडण्यात आली.यावेळी गावातील ज्येष्ठ मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com