हडलगे बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हडलगे बातमी
हडलगे बातमी

हडलगे बातमी

sakal_logo
By

हडलगेत दहशत निर्माण करणाऱ्या
सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

नेसरी : आपल्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे हातात तलवारी, काठ्या घेऊन दहशत माजवून दंगा केल्याबद्दल सहा जणांविरुद्ध नेसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास संदीप नाईक यांच्या घरासमोर, एस.टी. स्टॅण्ड येथे घडली. यलाप्पा ईराप्पा नाईक (वय. ४२ रा. हडलगे ता. गडहिंग्लज) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीवरून अशोक शिवाजी नाईक (रा. हडलगे पैकी माळवाडी, ता. गडहिंग्लज), जोतिबा भोमानी बोकमूरकर (रा. शिनोळी खुर्द ता. चंदगड), श्रीकांत मारुती पाटील रा. कुद्रेमनी (ता. जि. बेळगाव), ओमकार सुरेश शिवणगेकर (रा. सुळगा-हिंडलगा) ता. जि. बेळगाव, अनिकेत मोनाप्पा बोकमुरकर रा. शिनोळी खुर्द (ता. चंदगड), गुरुप्रसाद इराप्पा तरवाळ रा. शिनोळी खुर्द (ता. चंदगड) यांच्या विरोधात नेसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. फिर्यादी यांच्या वडिलांनी अशोक नाईक यांच्या विरोधात पोलिस ठाण्‍यात तक्रार दिल्याच्‍या कारणावरून हातात तलवारी, काठ्या घेऊन दहशत माजवून दंगा केला.