Tue, Feb 7, 2023

नेसरी येथे उद्या कार्यशाळा
नेसरी येथे उद्या कार्यशाळा
Published on : 17 January 2023, 1:15 am
नेसरी येथे
उद्या कार्यशाळा
नेसरी : येथील तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये गुरुवारी (ता. १९) नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (एनईपी-२०२०) अंतर्गत बी. ए. भाग- १, एम. ए. भाग- १ मधील इतिहास विषयाच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित शिवाजी विद्यापीठाने मंजूर केलेली एकदिवसीय कार्यशाळा होणार आहे. उद्घाटक तथा बीजभाषक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रो. डॉ. एम. एस. देशमुख, प्राचार्य डॉ. एस. बी. भांबरे मार्गदर्शन करणार आहेत. शिवाजी विद्यापिठाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. अवनिश पाटील ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० व इतिहास विषय’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.