कोलेकर महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोलेकर महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळा
कोलेकर महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळा

कोलेकर महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळा

sakal_logo
By

02053

नेसरी : तुकाराम कोलेकर महाविद्यालयामध्ये कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी डॉ. एम. एस. देशमुख, डॉ. अवनीश पाटील, डॉ. अर्चना कोलेकर, डॉ. एस. बी. भांबर, डॉ. एम. एस. कोळसेकर, प्रा. संगीता लोखंडे, तसेच मोहन शिंदे उपस्थित होते.
-----------
कोलेकर महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा
नेसरी, ता. २३ : नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एनईपी-२०२० अंतर्गत बी. ए. व एम. ए. भाग- १ मधील इतिहास विषयाच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर एक दिवसीय कार्यशाळा झाली. येथील तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. संस्था सचिव डॉ. अर्चना कोलेकर अध्यक्षस्थानी होत्या. बीज भाषक तथा शिवाजी विद्यापीठ अधिष्ठाता, मानव्यशास्त्र विद्याशाखा प्रो. डॉ. एम. एस. देशमुख यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. शिवाजी विद्यापीठ इतिहास विभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील, डॉ. भांबर, डॉ. चंद्रवदन नाईक, डॉ. ज्योती वटकर, डॉ. तानाजी हवालदार, डॉ. भारतभूषण माळी यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० या बदललेल्या अभ्यासक्रमवर मार्गदर्शन झाले. यावेळी डॉ. कविता गगराणी, डॉ. सुरेश चव्हाण, डॉ. संभाजी मोरे, डॉ. निवासराव वरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील इतिहास विषयाचे ६५ प्राध्यापक सहभागी झाले होते.