मुलात विवेक मोरे, मुलीत आकांक्षा शेलार प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलात विवेक मोरे, मुलीत आकांक्षा शेलार प्रथम
मुलात विवेक मोरे, मुलीत आकांक्षा शेलार प्रथम

मुलात विवेक मोरे, मुलीत आकांक्षा शेलार प्रथम

sakal_logo
By

02055
नेसरी : तुकाराम कोलेकर महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय क्रॉस कंट्री स्पर्धा सांघिक चॅम्पियन्सशिप गौरवप्रसंगी अॅड. हेमंत कोलेकर, डॉ. अर्चना कोलेकर, डॉ. पी. टी. गायकवाड, डॉ. एस. बी. भांबर, प्रा. एम. डी. पाटील, डॉ. कंचन बेल्लद, प्रा. आर. टी. पाटील, डॉ. इब्राहिम मुल्ला उपस्थित होते.
---------
मुलात विवेक मोरे, मुलीत आकांक्षा शेलार प्रथम
नेसरी कोलेकर महाविद्यालयामध्ये क्रॉस कंट्री स्पर्धा; ११० स्पर्धकांचा सहभाग
नेसरी, ता. २४ : येथील तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत आंतरविभागीय क्रॉस कंट्री स्पर्धा झाली. यात मुलांमधून विवेक मोरे, मुलींमधून आकांक्षा शेलार प्रथम आल्या.
संस्थाध्यक्ष अॅड हेमंत कोलेकर, संस्था सचिव डॉ. अर्चना कोलेकर यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २८ वरिष्ठ महाविद्यालयातील ११० मुले-मुली सहभागी झाले होते. मुलांमध्ये वैयक्तिक अनुक्रमे विवेक मोरे (शिवराज गडहिंग्लज), उत्तम पाटील (नाईट कॉलेज कोल्हापूर), ओंकार पन्हाळकर (शिवराज गडहिंग्लज), बबन शिंदे (कोवाड कॉलेज), सिद्धांत पुजारी (आजरा कॉलेज), प्रतिक ऊंबरकर (वाई कॉलेज).
मुलींमध्ये आकांक्षा शेलार (किसन वीर वाई), राणी मुचंडी (कोरेगाव), प्राजक्ता शिंदे, (कोवाड कॉलेज), सृष्टी रेडेकर (शिवराज कॉलेज), प्राची देवकर कराड, साक्षी हुक्केरी (कोलेकर नेसरी) विजेते ठरले. सांघिक चॅम्पियन्सशिप अनुक्रमे मुले माडखोलकर कॉलेज चंदगड, शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज, जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर, मुलींमध्ये शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज, किसनवीर महाविद्यालय वाई, राजे रामराव कॉलेज जत यांनी पटकावले. प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर यानी स्वागत व प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांचा गौरव झाला. माजी प्राचार्य एम. डी. पाटील आदी उपस्थित होते.
स्पर्धा निरिक्षक डॉ. पी. टी. गायकवाड, निवड समिती अध्यक्ष प्रा. आर. टी. पाटील, सदस्य डॉ. इब्राहिम मुल्ला, प्रा. शिला मोहीते, पंच प्रा. सुरेश धुरे, डॉ. सुरेश फराकटे, विनायक नाईक, संतोष देसाई, डी. व्ही. पाटील आदींनी परिश्रम घेतले. डॉ. बी. आर. दिवेकर यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा संचालक डॉ. के. बी. बेल्लद यांनी आभार मानले.