गतिरोधक, दिशादर्शक फलकांची गरज

गतिरोधक, दिशादर्शक फलकांची गरज

02258
कानडेवाडी फाट्यानजीक हवेत दिशादर्शक फलक
नेसरी, ता. ९ : अर्जुनवाडी-कानडेवाडी फाट्यनजीक गडहिंग्लज-चंदगड राज्य महामार्ग पार करताना अर्जुनवाडी, कानडेवाडीहून येणा-या वाहनधारकांची
गतिरोधक, दिशादर्शक फलक नसल्याने गैरसोय होत आहे.
गडहिंग्लज-चंदगड राज्य महामार्गाचे रूंदीकरण झाले. जागोजागी गतिरोधक पट्टे, फलक लावले आहेत. दैनंदिन मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची वर्दळ असते. चंदगडहून नेसरी, गडहिंग्लज, कोल्हापूरकडे तर गडहिंग्लजहून नेसरी, अडकूर, चंदगड, गोवा, तिलारी, पारगडकडे ये-जा करणा-या वाहनधारकांची वर्दळ असते. सध्या रस्ता रूंदीकरण झाल्याने वाहनधारक सुसाट वेगाने वहाने चालवतात. ऊस तोडणी हंगामात हेमरस, दौलत, आजरा, गडहिंग्लज, संताजी घोरपडे साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. नेसरी, कानडेवाडी प्रतापराव गुर्जर स्मारक असल्याने व चंदगड तालुक्यामध्ये अनेक पर्यटन पाॅईंट असल्याने पर्यटकांची वर्दळ असते. अर्जुनवाडी, कानडेवाडीहून येणा-या वाहनधारकांना रात्री गतिरोधक, दिशादर्शक फलक नसल्याने अपघाताची शक्यता अधिक आहे. अनेकदा किरकोळ अपघात घडले आहेत. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी योग्य उपाययोजना करण्याची मागणी नागरिक, प्रवासी वर्गातून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com