प्रदुषणास जबाबदार घटकांवर तात्काळ कारवाई करावी ; शिये ग्रामपंचायतीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदुषणास जबाबदार घटकांवर तात्काळ कारवाई करावी ; शिये ग्रामपंचायतीची मागणी
प्रदुषणास जबाबदार घटकांवर तात्काळ कारवाई करावी ; शिये ग्रामपंचायतीची मागणी

प्रदुषणास जबाबदार घटकांवर तात्काळ कारवाई करावी ; शिये ग्रामपंचायतीची मागणी

sakal_logo
By

शिये : नदी पात्रात मृत मासे तरंगत आहेत.
......................
02414
.....

प्रदुषणास जबाबदार घटकांवर कारवाई करा

शिये ग्रामपंचायतीची प्रदुषण नियंत्रण महामंडळाकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा

शिये, ता. ३ : पंचगंगेतील दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे प्रदुषणास जबाबदार घटकांची माहिती घेऊन संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिये ग्रामपंचायतीच्या वतीने प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिये - कसबा बावडा मार्गावरील पंचगंगा नदी पुलाखाली पात्रात शेकडो मृत मासे तरंगत आहेत. जाणकारांनी नदी पात्रातील पाणी प्रदूषणात वाढ झाल्याने मासे मृत होत असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर शियेच्या सरपंच शीतल मगदूम, ग्रामपंचायत सदस्या तेजस्विनी पाटील यांच्यासह सदस्य व कर्मचाऱ्यांनी नदी पात्राची पाहणी केली. आजही शेकडो मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. यामुळे परिसरात विशिष्ट प्रकारची दुर्गंधी पसरली आहे. पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. श्रीराम नगर, हनुमान नगर या भागात नदीचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. तसेच गावातील शेती उद्योग पूर्णपणे या पाण्यावर अवलंबून आहे. शेतात असणाऱ्या जनावरांना पिण्यासाठी हेच पाणी दिले जाते. दूषित पाण्यामुळे पाण्याखालील जैवविविधता धोक्यात आली असून मासे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांची दखल घेवून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सरपंच शितल मगदूम, उपसरपंच प्रभाकर काशीद व सर्व सदस्यांनी केली आहे
दरम्यान, पंचगंगा नदीचे पाणी या परिसरात नागरिक पिण्यासाठी वापरत असल्याने दूषित पाण्यामुळे कोणताही अनुचित घटना घडू नये यासाठी शिये ग्रामपंचायतीने दोन दिवस पाणी पुरवठा बंद केला आहे.
.....