दगड उत्खनन करारातून दोन कोटींची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दगड उत्खनन करारातून
दोन कोटींची फसवणूक
दगड उत्खनन करारातून दोन कोटींची फसवणूक

दगड उत्खनन करारातून दोन कोटींची फसवणूक

sakal_logo
By

दगड उत्खनन करारातून
दोन कोटींची फसवणूक
टोप येथील दाम्पत्याविरोधात गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. ११ : दोन कोटी बारा लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी टोप येथील पंचधारा महिला खाण मजूर व औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा व सचिवांविरुध्द शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला आहे. पूजा हणमंत चौगले व हणमंत तातोबा चौगले (दोघेही रा. गंधर्व रिसॉर्टजवळ, टोप, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. आदिती अरविंद पाटील (मेघराज कॉलनी, पुलाची शिरोली) यांनी याबाबत तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : आदिती पाटील यांचे पती अरविंद पाटील क्रशर व्यावसायिक आहेत. ते, आदिती यांच्या नावाने स्टोन क्रशर चालवतात. क्रशर करण्यासाठी त्यांना खाण मालकांकडून दगड विकत घ्यावा लागतो. अरविंद पाटील यांच्या संर्पकात टोप येथील पंचधारा महिला खाण मजूर व औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा पूजा चौगले व सचिव हणमंत चौगले आले. संस्थेच्या नावे दगड उत्खनन करण्याची कायदेशीर मान्यता आहे. वन विभागाने संस्थेच्या नावे शिये गावच्या हद्दीतील बारा एकर दहा गुंठे (४९० गुंठे) एवढे क्षेत्रही दगड उत्खनन करण्यासाठी दिले आहे, असे चौगले यांनी अरविंद पाटील यांना सांगितले. याबाबतचे कागदही दाखवले. त्यामुळे अरविंद पाटील यांनी त्यांच्यांशी दगड उत्खनन करण्याचा दहा वर्षांचा करार केला. दरम्यान, रॉयल्टी भरण्यासाठी चौगले दाम्पत्याने अरविंद पाटील यांच्याकडून दोन कोटी बारा लाख रुपये घेतले. दहा वर्षांचा उत्खनन करण्याचा करार असल्याने ही रक्कम त्या तुलनेत कमी होती; मात्र करारानंतर अवघ्या तीन महिन्यांत पंचधारा महिला खाण मजूर व औद्योगिक सहकारी संस्था अशा प्रकारे दुसऱ्याला उत्खनन करण्यासाठी जागा देऊ शकत नाही, असा मुद्दा पुढे करत चौगले दाम्पत्याने अरविंद पाटील यांना उत्खनन क्षेत्रात येण्यास प्रतिबंध केला. तुमचे पैसेही परत करू, असे आश्वासन दिले. अद्याप रक्कम परत मिळाली नसल्याने आदिती पाटील यांनी तक्रार दिली आहे.