Mon, Jan 30, 2023

अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी पोलिसांत गुन्हा
अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी पोलिसांत गुन्हा
Published on : 22 January 2023, 3:50 am
विनयभंगप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
नागाव : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोस्को अंतर्गत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीच्या आईने याबाबतची फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी पैसे सुट्टे करण्यासाठी एका ठिकाणी गेली असता संबंधित आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तणूक केली. घरी आल्यावर मुलीने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. त्यानंतर पीडित मुलीची आई तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेली. दरम्यान, आपल्याविरोधात गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण लागताच संबंधित संशयिताने पलायन केले. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.