कासारवाडी घाटात दिव्यांगासह दोन ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासारवाडी घाटात 
दिव्यांगासह दोन ठार
कासारवाडी घाटात दिव्यांगासह दोन ठार

कासारवाडी घाटात दिव्यांगासह दोन ठार

sakal_logo
By

२५०१ - नारायण मडके
2502 - अनिल वरूटे

कासारवाडी घाटात
दिव्यांगासह दोन ठार
दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक

सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. १३ : कासारवाडी (ता. हातकणंगले) येथे आज दोन मोटारसायकलींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे ठार झाले. अनिल बाबूराव वरुटे (वय ४१, रा. कासारवाडी, ता. हातकणंगले) व नारायण मडके (३८, रा. मादळे, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. सादळे-कासारवाडी घाटाच्या पायथ्याशी कुरुण नावाच्या शिवाराजवळ रात्री साडेसातच्या सुमारास अपघात झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सादळे येथील एका फार्म हाऊसवर वरुटे काम करतात. तेथेच त्यांनी रसवंतीगृहही सुरू केले आहे. सायंकाळी उशिरा काम आटोपून ते मोटारसायकलवरून कासारवाडी येथे घरी येत होते. सादळे-कासारवाडी घाट उतारावर कुरण नावाच्या शेताजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकल आणि नारायण मडके यांची विशिष्ट मोटारसायकलीची जोराची धडक झाली. नारायण मडके दिव्यांग आहेत. ते त्यांच्या मोटारसायकलवरून कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. ते परत येत असताना वरुटे यांच्या मोटारसायकलची धडक बसली. ही धडक प्रचंड वेगात आणि जोराची होती. यामध्ये वरुटे व मडके दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिली. दरम्यान, काही नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून घेतली. जखमींवर तत्काळ उपचार व्हावेत, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी दोघा जखमींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेचा पंचनामा करून नोंद घेण्याचे काम सुरू होते.

वेगावर हवे नियंत्रण
वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसणाऱ्यांसाठी कासारवाडी-सादळे घाट धोकादायक ठरत आहे. रोजी मादळेतील ट्रॅक्टरचालक कुमार चौगुले यांचा २९ जानेवारीला याच घाटातील एका वळणावर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला आज पंधरा दिवस झाले आणि आज पुन्हा दोघांचा बळी गेला.
...................
फोटो
१ ) अनिल वरुटे
२ ) नारायण मडके
.................................................................................................