नागावच्या विकासासाठी भरीव निधी देणार : सतेज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागावच्या विकासासाठी भरीव
निधी देणार : सतेज पाटील
नागावच्या विकासासाठी भरीव निधी देणार : सतेज पाटील

नागावच्या विकासासाठी भरीव निधी देणार : सतेज पाटील

sakal_logo
By

नागावच्या विकासासाठी भरीव
निधी देणार : सतेज पाटील
नागाव, ता. २३ : नागावच्या विकासासाठी भरीव निधी देणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. आमदार सतेज पाटील यांनी नागाव ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट दिली. या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी बोलत होते.
आमदार पाटील यांनी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आपल्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. वारणा सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुभाष पाटील यांच्या हस्ते आमदार पाटील यांचे स्वागत केले. नूतन सरपंच विमल शिंदे व उपसरपंच सुधीर पाटील यांचे आमदार पाटील यांनी अभिनंदन केले. या वेळी सुभाष पाटील व माजी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
उपसरपंच सुधीर पाटील यांनी स्वागत केले. याप्रसंगी महावीर पाटील, अभिनंदन सोळांकुरे, मोसमी कांबळे, संगीता वायदंडे, श्रेयस नागावकर, मंगल चव्हाण, संगीता कोळी, शुभांगी पवार, अश्विनी माळी, अक्षय कांबळे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य अभिनंदन सोळांकुरे यांनी आभार मानले.