वैरण कापल्याचा राग मनात धरून शियेत काठीने मारहाण ; दोन महिलेंसह तिघे जखमी

वैरण कापल्याचा राग मनात धरून शियेत काठीने मारहाण ; दोन महिलेंसह तिघे जखमी

वैरणीवरून शियेत तिघांना मारहाण
नागाव, ता. १० : बांधावरील वैरण कापल्याचा राग मनात धरून शिये येथे तिघांना काठीने मारहाण करण्यात आली. यामध्ये दोन महिलांसह तिघे जखमी आहेत. काकासो शामराव पोवार ( वय ४३), शकुंतला शामराव पोवार व सविता काकासो पोवार ( तिघेही रा. नाईक धाब्याजवळ हनुमान नगर, शिये, ता. करवीर) अशी जखमींची नावे आहेत. काकासो पोवार यांच्या फिर्यादीवरून दिनकर शंकर पोवार यांच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आज सकाळी साडेसात वाजता हनुमाननगर शिये येथे शेतात घडली.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी : काकासो पोवार यांनी दिनकर पोवार यांच्या हनुमान नगर येथील गट क्रमांक ५६९/२ शेतातील बांधावरील वैरण कापली होती. याचा राग मनात धरून दिनकर पोवार यांनी काकासो यांना काठीने मारहाण केली. त्यांना मारहाण करत असताना काकासो यांच्या आई शकुंतला व पत्नी सविता या दिनकर यांना अडवू लागल्या. त्यामुळे दिनकर पोवार यांनी त्या दोघींनाही काठीने मारहाण केली. जखमींना कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तिथेच याबाबत गुन्हा दाखल होऊन तो शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यास वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com