भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची निवड
भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची निवड

भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची निवड

sakal_logo
By

02695
...
भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षपदी
शौमिका महाडिक यांची निवड

नागाव, ता. ३० : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि गोकुळच्या विद्यमान संचालक शौमिका महाडिक यांची भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी याबाबतची घोषणा केली.
यापूर्वी शौमिका महाडिक यांनी भाजप महिला मोर्चा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून तीन वर्षे काम पाहिले आहे. राज्य कार्यकारिणीत कोल्हापुरातून निवड होणाऱ्या त्या एकमेव महिला पदाधिकारी आहेत. आपल्या आक्रमक शैलीने विरोधकांना नामोहरण करणाऱ्या शौमिका महाडिक यांनी कोल्हापूरच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवला आहे. भाजपच्या कोल्हापूर जिल्ह्यातील धडाडीच्या महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. ‘गोकुळ’ मधील कारभाराबाबत वेळोवेळी वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे.
त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.