रोटरीची वृक्षारोपण मोहीम दिशादर्शक : उदय गायकवाड

रोटरीची वृक्षारोपण मोहीम दिशादर्शक : उदय गायकवाड

Published on

03283
शिये : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे आयोजित वृक्षारोपणप्रसंगी उदय गायकवाड. यावेळी संजय भगत, सरपंच शीतल मगदूम, उपसरपंच प्रभाकर काशीद, आदी उपस्थित होते.


‘रोटरी’चा वृक्षारोपण मोहीम
दिशादर्शक : उदय गायकवाड
सकाळ वृत्तसेवा
शिये, ता. ७ : जागतिक तापमान वाढीच्या काळात झाडे लावून ती जगवली पाहिजेत. अशा काळात रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे राबविण्यात आलेली वृक्षारोपण मोहीम दिशादर्शक आहे, असे मत पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे शिये येथे आयोजित वृक्षारोपण मोहिमेच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष संजय भगत हे अध्यक्षस्थानी होते.
गायकवाड म्हणाले, ‘तापमान आणि प्रदूषण वाढ होत असताना झाडांचे महत्त्‍व जाणून घेणे आवश्यक आहे. रोटरीच्या सहकार्याने शिये ग्रामपंचायतीने वृक्षरोपण एक चळवळ म्हणून उभी करावी. भविष्यात झाडांचे गाव म्हणून शिये गावची ओळख निर्माण करावी.’
रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष संजय भगत यांनी हनुमाननगर परिसरात ४२५ झाडे लावून त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात येणार असल्याचे सांगितले. शिये येथील हनुमाननगर येथे पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वृक्षांच्या संरक्षणासाठी सभोवती तारेचे कुंपण लावण्यात आले. यावेळी पांडुरंग पाटील, उपसरपंच प्रभाकर काशीद यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिये सरपंच शीतल मगदूम, ग्रामपंचायत सदस्य बाबासो बुवा, जयसिंग फडतारे, तेजस्विनी पाटील, रोटरी सेंट्रलचे खजानिस नीलेश पाटील, उद्योजक अविनाश चिकणीस, प्रकाश जगदाळे, संदीप साळोखे, संजय कदम, विशाल पाटील, आर. वाय. पाटील, नरेश शिंगाडे, चंद्रकांत थोरात, डॉ. हणमंत पाटील, राहुल माने, पंडित गाडवे, आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी प्रास्ताविक केले. सचिव रवी खोत यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.